मराठवाडा स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट फायनान्सच्या पदी विधी सल्लागार म्हणून निवड – ॲड. श्रीराज शेळके पाटील


मराठवाडा विभागातील लघुउद्योगांना चालना देण्यासाठी कार्यरत असलेल्या मराठवाडा स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट फायनान्स या संस्थेच्या विधी सल्लागार पदी ॲड. श्रीराज शेळके पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठवाडा स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट फायनान्स चे संचालक प्रा.शिवराज बांगर पाटील व श्री. विनोद बडे यांनी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. ॲड. श्रीराज शेळके पाटील यांनी विविध कायदेशीर क्षेत्रात केलेले कार्य, तसेच त्यांचा अनुभव आणि अभ्यास पाहता त्यांची निवड करण्यात आल्याचे फायनान्स च्या वतीने सांगण्यात आले.या नियुक्तीमुळे फायनान्स च्या कार्यात कायदेशीर पारदर्शकता वाढण्यास मदत होणार असून, सदस्य उद्योजकांना करार, कर्ज व्यवहार, वादविवाद आणि इतर कायदेशीर बाबींमध्ये योग्य मार्गदर्शन मिळणार आहे.या नियुक्तीच े सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, उद्योग क्षेत्रात यामुळे सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!